Amruta Khanvilkar(अमृता खानविलकर)
Amruta Khanvilkar
नाव : अमृता राजू खानविलकर.
जन्म : नोव्हेंबर २३, इ.स. १९८४
पुणे, महाराष्ट्र, भारत .
राष्ट्रीयत्व : भारतीय
कार्यक्षेत्र : अभिनय (चित्रपट), सूत्रसंचालन (टीव्ही)
कारकीर्दीचा काळ : इ.स. २००४ - चालू
भाषा : मराठी (स्वभाषा) , मराठी, हिंदी (अभिनय)
प्रमुख चित्रपट : गोलमाल साडे माडे तीन
प्रमुख टीव्ही कार्यक्रम : कॉमेडी एक्सप्रेस
वडील : राजू खानविलकर
आई : गौरी खानविलकर
जीवन:- अमृता खानवलकर ही मूळची पुण्याची आहे. तिचे शालेय शिक्षण पुण्याच्या कर्नाटक हायस्कुलात झाले; तर महाविद्यालयीन शिक्षण मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयात झाले.
कारकीर्द :- अमृता खानविलकर हिची कारकिर्द झी टीव्ही दूरचित्रवाहिनीच्या इ.स. २००४मधील "झी इंडियाज् बेस्ट सिनेस्टार्स की खोज" या गुणवत्ता-शोधन कार्यक्रमातील सहभागातून सुरू झाली. यात तिने तिसरा क्रमांक पटकावला. त्यानंतर सहारा वन दूरचित्रवाहिनीवरील "अदा" या मालिकेत तिला भूमिका मिळाली. तिने झी म्युझिक वाहिनीवरील "बॉलिवुड टुनाइट" या चित्रपट संगीतविषयक कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले. ई टीव्ही मराठीवरील "कॉमेडी एक्सप्रेस" (इ.स. २०१०) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिने केले. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाच्या पहिल्या कालखंडात तिने सुमारे साडेतीनशे भागांमध्ये संचालनाची सूत्रे सांभाळली. त्यानंतर काही काळाच्या विरामानंतर जुलै इ.स. २०१२मध्ये तिने "कॉमेडी एक्सप्रेस" कार्यक्रमात सूत्रसंचालनासाठी पुनरागमन केले .